कोलकाता: दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या मॅचमध्यो कोलकत्याचा 9 विकेट्सनं विजय झाला आहे. पहिल्या मॅचप्रमाणेच ही मॅचही एकतर्फीच झाली. टॉस जिंकून कोलकत्याचा कॅप्टन गौतम गंभीरनं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिली बॅटिंग करताना दिल्लीच्या संघाला फक्त 98 रनच बनवता आल्या. 17.4 ओव्हरमध्ये दिल्लीचा संघ ऑलआऊट झाला. कोलकत्याकडून आंद्रे रसेल आणि ब्रॅड हॉगनं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर पियुष चावला आणि हेस्टिंग्जला प्रत्येकी 2 विकेट घेण्यात यश आलं. 


99 रनचा पाठलाग कोलकत्यानं अगदी सहज केला. रॉबिन उथ्थपानं 35 तर कॅप्टन गौतम गंभीरनं नाबाद 38 रन बनवल्या.