सिंधूच्या यशावर मी थुंकलो तर?, मल्याळम दिग्दर्शकाचे वादग्रस्त विधान
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक मिळवत नवा इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये हा नवा इतिहास रचणाऱ्या सिंधूचे सर्वत्र कौतुक केले जातेय.
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक मिळवत नवा इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये हा नवा इतिहास रचणाऱ्या सिंधूचे सर्वत्र कौतुक केले जातेय.
भारतात परतल्यानंतर मोठ्या जल्लोषात सिंधूचे स्वागत करण्यात आले. तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरु आहे. या विजयाच्या जल्लोषादरम्यान मल्ल्याळम दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांनी वादग्रस्त विधान केलंय.
सध्या सिंधूच्या विजयाचा जल्लोष सुरु आहे. मी या जल्लोषावर थुंकलो तर काय होईल? यात जल्लोष कऱण्यासारखे काय आहे, असे त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
सनल कुमार यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदा टीका सुरु केलीये. दरम्यान या टीकेला सनल कुमार यांनी उत्तर दिलेय. त्यांनी या टीकेला ब्लॅक ह्यूमर असे म्हटलेय.