सचिनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. खुद्द सचिन तेंडुलकरनंच हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. 26 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
याआधी अजहर आणि धोनी या दोन क्रिकेटपटूंचे बायोपिक रिलीज झाले आहेत. यातल्या धोनीच्या बायोपिक बॉक्स ऑफिसवर सूपर हिट ठरला तर अजहरच्या बायोपिकला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.