या प्रसिद्ध खेळाडूने टॅक्समध्ये केली हेरी-फेरी
आपली कमाईवरील टॅक्स वाचवण्यासाठी लोक स्विस बँकत पैसे जमा करतात. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही नाव आलेय. ज्याने आपल्या कमाईचा काही भाग टॅक्स वाचवण्यासाठी स्विस बँकेत जमा केलेत.
नवी दिल्ली : आपली कमाईवरील टॅक्स वाचवण्यासाठी लोक स्विस बँकत पैसे जमा करतात. या यादीत रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही नाव आलेय. ज्याने आपल्या कमाईचा काही भाग टॅक्स वाचवण्यासाठी स्विस बँकेत जमा केलेत.
स्पेनमधील एका वृत्तपत्रातील माहितीनुसार, रोनाल्डोने 2015मध्ये आपली कमाई जाहीर केली होती. त्यानुसार रोनाल्डोने 2015मध्ये 225 मिलियन युरो म्हणजेच 16 अब्ज रुपयांची त्याने कमाई केली.
या कमाईपैकी तब्बल 20 मिलियन युरोवरील टॅक्स वाचवण्यासाठी त्याने ही रक्कम 22 स्विस बँकेच्या खात्यात ठेवली. त्या वर्तमानपत्राने असा दावा केलाय की त्यांच्या हाती रोनाल्डोच्या टॅक्स रिटर्नचे कागदपत्र हाती लागलेत. या कागदपत्रानुसार रोनाल्डोने 20 मिलियन युरो म्हणजेच 143 कोटी रुपये स्विस खात्यात जमा केल्याची माहिती आहे.