नवी दिल्ली : नवी पिढी खेळाडुंना आपले आयकॉन मानते, पण हेच खेळाडू सार्वजनिक ठिकाणी विक्षिप्त चाळे करताना दिसले तर... दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हरकती करताना काही खेळाडूंनीही हेच केलंय...
 
ब्रिटनच्या चेल्टेनहेम फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या वेळी अशीच एक घटना घडलीय. इथं काही प्रोफेशनल फुटबॉलपटून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांसमोर केलेल्या अश्लील हरकती सध्या टीकेचा आणि चर्चेचा विषय ठरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मेल ऑनलाईन'नं दिलेल्या माहितीनुसार, एम के डॉन्सच्या मिडफिल्डर समीर कारुथर्स आणि नॉर्थम्पटन टाऊनच्या जेम्स कोलिन्सनं पहिल्यांदा बालकनीमध्येच सर्वांसमोर सू-सू केली... आणि नंतर ते खाली उभ्या असलेल्या गर्दीच्या अंगावर फेकून दिलं. 


एव्हढंच नाही तर, या प्रायव्हेट बॉक्समध्ये टीव्ही स्टार जेसिका हेज आणि ग्लॅमर मॉडल केटी सेलमनही उपस्थित होती. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीही नशेमध्ये होत्या. या दोघींनी उपस्थितांसमोरच आपल्या गाऊनचा वरचा भाग उघडा करून दर्शकांकडे पाहून अश्लील इशारे केले. 


चेलटेनहेम रेसकोर्सनं कारवाई करत आता या सर्वांना रेसकोर्समध्ये प्रवेशास बंदी घातली आहे.