नवी दिल्ली : आशिया कप जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही विधान केले. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो खासकरुन क्रिकेटमध्ये असे धोनी म्हणाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार देण्यात आलाय. मात्र आपल्या देशात या अधिकाराचा वापर मुळातच चुकीच्या पद्धतीने होतो. बोलण्याचे स्वातंत्र्य आहे याचा अर्थ काहीही बोलणे नव्हे. भारतात प्रत्येकाला क्रिकेटवर बोलण्याचा मत मांडण्याच अधिकार आहे. असे खेळा, तसे खेळा, असे करा, तसे करा असे सल्ले प्रत्येक जण देत असतात. मात्र तुम्ही केवळ टिव्हीवर बसून सामना बघत असता. टीव्हीवर बसून सामना बघणे आणि प्रत्यक्षात मैदानावर खेळणे यात मोठे अंतर आहे, असे धोनी म्हणाला. 


अनेकदा चांगला खेळ नाही झाला तर क्रिकेटर्सना टीका झेलावी लागते. जर कोणी मला विचारले तुला काय आवडते तर मी उत्तर देईन मला देशासाठी खेळायला आवडते. मी कधीच दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळणार नाही. दरम्यान, प्रत्येकाला त्याचे निर्णय़ घेण्याचा अधिकार आहे. तो कोणता रस्ता निवडेल हा त्याचा निर्णय असेल, असे धोनीने सांगितले.