मुंबई : नेहमी ट्विटरवरुन मतं मांडणारा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने पुन्हा एकदा मोठं मन दाखवलं आहे. गंभीरला दिल्ली डेअडेविल्सविरोधात कोलकाताच्या ईडन गार्डंन मैदानावर विजयावनंतर मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंभीरने त्याला मिळालेला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची राशि एक लाख रुपये सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबियांना दिली. याआधी गुरुवारी गंभीरने सुकमा हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.


गंभीरने मॅचनंतर म्हटलं की, ही रक्कम तो छत्तीसगढमधील सुकमामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी खर्च करेल. जवान आमच्या सुरक्षेसाठी त्यांचा जीव धोक्यात टाकतात. यामुळे त्यांच्यासाठी काही करणं हे आमचं दायित्व बनतं.