टीम इंडियासह गीता बसराचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन
भारताचा अव्वल स्पिनर हरभजन सिंगची पत्नी गीता बसराचा रविवारी वाढदिवस झाला. गीताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू उपस्थित होते.
नागपूर : भारताचा अव्वल स्पिनर हरभजन सिंगची पत्नी गीता बसराचा रविवारी वाढदिवस झाला. गीताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी भारतीय संघातील क्रिकेटपटू उपस्थित होते.
कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, शिखर धवनसह अनेक क्रिकेटपटू यावेळी तेथे होते.
गीताने टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसह केक कापून वाढदिवस साजरा केला. हरभजनने फेसबुक अकाऊंटवरुन गीताच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केलेत.