मेघा कुचिक, मुंबई : मुंबईतल्या एका जिगरबाज मुलीच्या यशाची ही कहाणी... दोन्ही पायांनी अधू असणारी... पॉवर लिफ्टिंग करणारी... एव्हढंच नाही तर याच क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर दोन गोल्ड मेडल पटकावणारी अशी ही मुलगी...  ऐकून आश्चर्य वाटलं ना... जाणून घेऊयात तिच्याचबद्दल... 


धैर्यशील सुषमा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा जगदाळे अडीच वर्षांची असताना तिला पोलिओ झाला... आणि दोन्ही पाय कायमचे अधू झाले. पण सुषमा खचली नाही... ती जिद्दीनं उभी राहिली... ती अत्यंत नॉर्मल आयुष्य जगू लागली... आणि आता तर तिनं पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारात दोन वेळा गोल्ड मेडल मिळवलंय. बंगळुरुला नुकत्याच झालेल्या १५ व्या पॅरालिम्पिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचं  तिनं प्रतिनिधित्व केलं. ६७ किलो वजनी गटात ६१ किलो वजन उचलत सुषमान गोल्ड मेडलवर नाव कोरलं.


स्विमिंगचाही नाद... 


सुषमा मंत्रालयात नोकरी करते. ती तिच्या तीन चाकी स्कूटीनं मंत्रालय ते बांद्रा किंवा मंत्रालय ते गोरेगाव असा प्रवास करते. फिटनेससाठी सुषमा स्विमिंगही करते. खरं तर सुषमा सुरुवातीला पॉवर लिफ्टिंग करत नव्हती. मात्र काही वर्षापूर्वी तिची भेट तिचे कोच भूषण कासेकरांशी झाली आणि त्यांना एक सुवर्णकण्याच गवसली.


आपले दोन्ही पाय अधू आहेत याचं जराही दुःख न बाळगता सुषमा जिद्दीनं पायावर उभी राहिलीय... तिच्या याच जिद्दीला झी २४ तासचा सलाम...