गुगल डूडलवर टी-२०चे महायुद्ध सुरु
आजपासून भारतात टी-२० वर्ल्डकपच्या महायुद्धाला सुरुवात होतेय. वर्ल्डकपमधील पहिलाच सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे.
मुंबई : आजपासून भारतात टी-२० वर्ल्डकपच्या महायुद्धाला सुरुवात होतेय. वर्ल्डकपमधील पहिलाच सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे.
गुगलनेही या निमित्ताने अनोखे डूडल बनवलेय. या डूडलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्या जर्सीच्या रंगाच्या बॅट दिसत आहेत आणि त्या दोन बॅटमध्ये चेंडू दिसतोय. त्यावर क्लिक केल्यास वर्ल्डकपचे टाईमटेबल दिसते. तसेच वर्ल्डकपशी संबंधित बातम्या दिसतात.
२००७मध्ये पहिला वर्ल्डकप झाला होता. भारतीय संघाने द. आफ्रिकेत झालेला पहिला वर्ल्डकप जिंकला होता.