क्रिकेटमधला सगळ्यात जबरदस्त सेल्फी
सेल्फी काढण्याचा ट्रेन्ड सध्या जबरदस्त जोरात सुरु आहे. क्रिकेटरही या ट्रेन्डपासून कसे मागे राहतील.
मुंबई: सेल्फी काढण्याचा ट्रेन्ड सध्या जबरदस्त जोरात सुरु आहे. क्रिकेटरही या ट्रेन्डपासून कसे मागे राहतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या तीन दिग्गजांनीही असाच एक सेल्फी काढला आहे.
हे त्रिमूर्ती आहेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि शेन वॉर्न. खुद्द शेन वॉर्ननच हा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
20 वर्ष या दोघांविरोधात खेळण्यात मजा आली, पण त्यांच्याविरुद्ध बॉलिंग करण्यात एवढी मजा आली नाही, असं शेन वॉर्न म्हणाला आहे.