मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स या संघादरम्यान रंगलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. पंजाबवर पाच विकेट्सने विजय मिळवत गुजरातच्या संघाने विजयी सलामी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयात चमकला तो गुजरातचा आरोन फिंच. त्याच्या तडफदार अर्धशतकाच्या जोरावर संघाला विजय मिळवता आला. सुरुवातीला फलंदाजी करताना पंजाबने १६१ धावा केल्या. 


त्यांचे हे आव्हान गुजरातने पाच विकेट आणि १४ चेंडू राखत सहज पूर्ण केले. आरोनने ७४ धावांची खेळी दमदार खेळी केली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर ड्वायेन ब्राव्होने चार विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले.