गुजरात लायन्सचा दिल्लीवर १ रनने विजय
आईपीएल सीझन ९ मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर आज 23वा सामना दिल्ली डेयरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यामध्ये खेळला जातोय. कर्णधार जहीर खानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आईपीएल सीझन ९ मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर 23वा सामना दिल्ली डेयरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यामध्ये रंगला. कर्णधार जहीर खानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
गुजरातची टीमने खूप चांगली सुरुवात केली पण ती शेवटपर्यंत त्यांना टिकवता आली नाही त्यामुळे २०० हून अधिक स्कोर उभा करण्याच्या स्थितीत असलेल्या टीमला फक्त १७१ रन्स करता आले.
दिल्ली डेअरडेविल्सची सुरुवात खूप चांगली नव्हती. लवकर ३ विकेट गमवत दिल्ली वाईट स्थितीत आला पण नंतर ड्युुमिनी आणि मॉरिसने जबरदस्त खेळी केली. पण शेवटी एक रनने त्यांना पराभव स्विकारावा लागला. मॉरिसने ३२ बॉलमध्ये ८२ रन्सची तुफानी खेळी केली.
पाहा लाईव्ह स्कोरकार्ड