राजकोट: आयपीएलच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 7 विकेट आणि 12 बॉल राखून विजय झाला आहे. या मॅचमध्ये धोनीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यानं 20 ओव्हरमध्ये 163 रन केल्या. यामध्ये मोलाचं योगदान दिलं ते फॅप डुप्लेसिसनं, त्यानं 43 बॉलमध्ये 69 रन बनवल्या. तर धोनीनं 5 नंबरला येऊन 10 बॉलमध्ये झटपट 22 रन बनवल्या. 


164 रनचा पाठलाग करताना गुजरात लायन्सची सुरुवात चांगली झाली. ओपनर फिन्चनं 36 बॉलमध्ये 50 आणि ब्रॅन्डन मॅक्कलमनं 31 बॉलमध्ये 49 रन केल्या. त्यानंतर रैना (24) आणि ब्रॅव्होनं (22) गुजरातचा विजय सोपा केला. 


आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये गुजरातचा 2 सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. या विजयामुळे गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकवार गेली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर दुसऱ्या क्रमांकावर आहे.