मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरातनं टॉस जिंकला, पहिले बॅटिंगचा निर्णय
आयपीएलमध्ये आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये सुरेश रैनाची गुजरात लायन्स रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी भिडत आहे.
राजकोट : आयपीएलमध्ये आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये सुरेश रैनाची गुजरात लायन्स रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सशी भिडत आहे. या मॅचमध्ये गुजरातनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
लागोपाठ सहा मॅच जिंकल्यानंतर मागच्या मॅचमध्ये मुंबईला पुण्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे या मॅचमध्ये मुंबई पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी उतरेल. या मॅचमध्ये मुंबईनं दोन बदल केले आहेत. कर्ण शर्माऐवजी कृणाल पांड्याची आणि मिचेल जॉनसनऐवजी लसीथ मलिंगाची निवड करण्यात आली आहे.
पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर मुंबई १२ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर गुजरातकडे सहा पॉईंट्स आहेत. १४ पॉईंट्ससह केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी मुंबईला ही मॅच मोठ्या फरकानं जिंकावी लागेल.