इंदूर : पहिल्यांदाच रणडी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघाची सध्या चर्चा होतेय. मात्र त्याचबरोबर या संघातील एका खेळाडूने केलेल्या बेशिस्त वर्तनाची चर्चाही सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि गुजरातमधील अंतिम सामन्यादरम्यान गुजरातचा गोलंदाज आर पी सिंगची असभ्य वर्तणूक पाहायला मिळाली. आर पी सिंग क्षेत्ररक्षण करत असताना नेटच्या जवळ असेलेल चाहते सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते. 


यावेळी रागाने आर पी सिंगने एका चाहत्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मैदानात फेकला. त्याच्या या कृत्यामुळे तो नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.