हरभजनच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन
भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि गीता बसराच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमनं झालंय. गीता आणि हरभजनला गोंडस कन्यारत्नाचा लाभ झालाय.
लंडन : भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि गीता बसराच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमनं झालंय. गीता आणि हरभजनला गोंडस कन्यारत्नाचा लाभ झालाय.
हरभजनची आई अवतार कौर यांनी ही माहिती एका हिंदी वेबसाईटला दिली. २७ जुलैला गीताने चिमुकल्या कन्येला जन्म दिला. हरभजनच्या आईने फोनवरुन हरभजन आणि गीताला शुभेच्छा दिल्या.
हरभजन आणि गीताचे लग्न गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते. भज्जी पंजाब पोलीस विभागात एसपी पदावर आहे. काही दिवसांपूर्वीच हरभनज गीताला भेटण्यासाठी लंडनमध्ये गेला होता.