टेस्टमध्ये हार्दिकला संधी तर ईशांत, गंभीरचं कमबॅक
न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. या सिरीजसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यावर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून होतं. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.
पहिल्या २ टेस्टसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशांत शर्माला संघात जागा मिळाली आहे. आजारी असल्यामुळे न्यूझीलंड विरोधातील सिरीजमध्ये त्याला खेळता आलं नव्हतं. पण त्याने आता पुन्हा कमबॅक केलं आहे.
हार्दिक पांड्याला टेस्ट फॉरमॅटमध्ये संधी मिळाली आहे. हार्दिक हा टेस्ट टीममध्ये नवा चेहरा असणार आहे. जयंत यादव याला देखील संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. रोहितवर सर्जरी होऊ शकते त्यामुळे त्याला ७ ते ८ आठवड्यांच्या आरामाची गरज आहे.
पहिल्या २ टेस्टसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, शमी, गंभीर, आर. अश्विन, जडेजा, जयंत यादव, हार्दिक पांड्या, उमेश यादव, करुण नायर, अमित मिश्रा, सहा, पुजारा