मीरपूर : आक्रमक फलंदाजी त्याची स्वाभाविक शैली आहे, पण ऑलराऊंडर फलंदाज हार्दिक पांड्या म्हणतो की मी पिंच हिटर नाही, एक प्रॉपर फलंदाज आहे. बांगलादेश वि. सामन्यात त्याने १८ चेंडूत ३१ धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याची प्रशंसा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंड्या म्हटला की, ही माझी शैली आहे. मी असं खेळत आलो आहे. मला पिंच हिटर म्हणून नाही पाठविले पाहिजे. मला वाटते की मी जन्युअन फलंदाज आहे. ही चांगली गोष्ट आहे की टीमच्या ज्या वेगाने रन पाहिजे त्या वेगाने मी रन्स काढत आहे. 


मला नाही माहित आक्रमक फलंदाजी मी कोणाकडून शिकली. पण लहानपणापासून मला सिक्सर मारायला खूप आवडते. मला चेंडुला पिटाळायला आवडते. मला वाटते की पहिल्या चेंडूपासून सिक्सर मारला पाहिजे, असे पांड्या म्हणाला. 


मी १६ या १७ वर्षांचा होतो तेव्हापासून मला सिक्सर मारायला आवडत होते. असे क्रिकेट खेळले तर कधी यशस्वी होतो तर कधी नाही. मला एबी डिव्हिलिअर्स आणि धोनीची फलंदाजी आवडते.