मुंबई : भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या फिल्डिंगमध्ये अचानक ऐवढा बदल कसा आला याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मागील १० वर्षापासून टीम इंडियामध्य़े सुधार आणण्याचा प्रयत्न सुरु होता पण २०११ मध्ये हा प्रयत्न यशस्वी ठरला जेव्हा ट्रेवोर पेनी हे भारतीय टीमचे फिल्डिंग कोच बनले. 


पेनी हे पोलीस दलात होते. पेनी हे स्वभावाने खूपच कडक आहेत. त्यांनी ठरवलेल्या गोष्टींमध्ये ते कधीच बदल करत नाही. फिल्डिंगमध्ये सुधार आणण्यासाठी ते वेगवेगळ्या आयडियांचा वापर करायचे. ते प्रत्येक खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी उभे करतात आणि बॉल स्टम्पवर मारायला सांगतात. ज्यामुळे खेळाडूंना ही अशा वेगवेगळ्या आयडियांमुळे फिल्डिंग करण्यात आणखी मज्जा येवू लागली आणि फिल्डिंगवर खेळाडू ध्यान देवू लागले.


२०१३ च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय टीमची फिल्डिंग सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी होती. भारतीय टीमच्या त्या उत्तम फिल्डिंगचं श्रेय निश्चितच ट्रेवोर पेनी यांना जातं.