मुंबई : भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख नेहमीच कॅप्टन कूल असा होतो. मैदानामध्ये नेहमीच शांत असलेल्या धोनीनं साक्षीबरोबर अचानक लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 मध्ये धोनीचं लग्न झालं होतं. आता खुद्द धोनीनंच साक्षीबरोबरच्या त्याच्या लव्ह स्टोरीची कबुली दिली आहे. एका टीव्ही चॅनलला धोनीनं मुलाखत दिली आहे. मी आणि साक्षी आधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो, डेटही करत होतो. आम्ही दोघं सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. वॅलंटाईन डेच्या दिवशी मी साक्षीला प्रपोज केलं असं धोनी म्हणाला आहे. 


मी साक्षीला आय लव्ह यू म्हणालो नाही तर विल यू मॅरी मी असं विचारल्याचं धोनी म्हणाला आहे. धोनीच्या लग्नाला आता सहा वर्ष झाली आहेत आणि त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव जिवा आहे.