नवी दिल्ली : पंजाब शहराला ड्रग्जचा विळखा पडलाय हे सत्य आहे... आणि याचंच समर्थन केलंय भारतीय हॉकी टीमचा कॅप्टन सरदार सिंहनं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उडता पंजाब'च्या वादविवादानंतर एका वर्तमानपत्राशी बोलताना सिंहनं आपली भावना व्यक्त केलीय. आज पंजाबमधील लोक स्वस्थ नाहीत तर ते नशेच्या आहारी गेलेले आहेत आणि ही खूप त्रासदायक गोष्ट आहे, असं सरदार सिंहनं म्हटलंय. 


मी स्वत: हॉकी खेळाडू नसतो तर मीही आज नशेच्या आहारी गेलेला दिसलो असतो, असंही त्यानं म्हटलंय. 


पंजाबच्या तरुणांना नशेनं घेरलंय. त्यामुळेच त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे... त्यामुळे मुलांचं ध्यान वाईट गोष्टींकडे जाणार नाही, असंही सरदार सिंगला वाटतंय. 


सरदार सिंह स्वत: हरियाणा पोलीसांत डीएसपी आहे. 'उडता पंजाब'च्या प्रदर्शनाच्या वादावर बोलणं त्यांनी टाळलं असलं तरी नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांवर मात्र त्यांनी आपलं लक्ष केंद्रीत केलंय.