DRSवरून बोथमने भारतीयांना डिवचले
जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघटना BCCI गेल्या अनेक वर्षांपासून DRS ला विरोध करत आलीये. मात्र बदलत्या काळात decision review system ला विरोध करू शकत नाही आणि drs चं महत्व पटल्यामुळे टेस्ट कॅप्टन विराट कोहलीनं याला मान्यता दिलीये. यावर भारतीयांना त्यांची चूक आता उमगली असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बॉथम यांनी दिलीये.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघटना BCCI गेल्या अनेक वर्षांपासून DRS ला विरोध करत आलीये. मात्र बदलत्या काळात decision review system ला विरोध करू शकत नाही आणि drs चं महत्व पटल्यामुळे टेस्ट कॅप्टन विराट कोहलीनं याला मान्यता दिलीये. यावर भारतीयांना त्यांची चूक आता उमगली असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बॉथम यांनी दिलीये.
महेंद्रसिंग धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली पर्वाला सुरुवात झाली. गेली कित्येक वर्ष DRS ही तांत्रिक निर्णय व्यवस्था लागू करण्यास bcci नकार देत आली आहे. मात्र आता भारतीय क्रिकेट टीम drs लागू करण्यास तयार झालीय. 2008 पासून भारतीय क्रिकेट टीम डीआरएसला विरोध करत आली आहे.
अगदी सचिन तेंडुलकर आणि धोनीनंदेखील drs ला विरोध दर्शवला होता. मात्र आता कोहली याचबरोबर कोच अनिल कुंबळे यांनी drs लागू करण्यास संमती दर्शवलीय. आधिनुकतेच्या काळात तंत्रज्ञानाला नाकारून चालणार नाही म्हणूनच भारताला त्यांची चूक उमगल्याच मत इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बॉथम यांनी व्यक्त केलंय.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टेस्ट टीम चांगली करत असून भारतानं इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्टच्या मालिकेमध्ये 2-0 नं आघाडी घेतली आहे. यामुळे आता इंग्लंडसमोर कमबॅकचं आव्हान असेल. इंग्लंड हे आव्हान पार पाडेल का यावर बॉथम यांनी काय उत्तर दिलं पाहूयात...
इंग्लंड टीम गेल्या काही वर्षांपासून drs चा वापर करत आहे. यामुळे नक्की कोणत्या वेळी drs अपील करावं हे त्यांना उमगलय. तर आता टीम इंडियासमोर drsचा वापर नक्की कधी करावा याचा निर्णय घेण्याचं आव्हान असेल.