मुंबई: पाकिस्तानचा लेग स्पिनर यासीर शहावर आयसीसीनं 3 महिन्यांची बंदी घातली आहे. उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्यानं आयसीसीनं ही कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये अबु धाबीत वनडे झाली. यावेळी यासिरची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये यासिर दोषी आढळला त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


 


दरम्यान आपण बायकोचं ब्लड प्रेशरचं औषध घेतलं होतं, यामागे कामगिरी सुधरवण्याचा कोणताही उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण यासिरनं दिलं आहे. आयसीसीनंही यासिरचं हे म्हणणं स्विकारलं आहे. यामागे यासिरचा कोणताही चुकीचा उद्देश नसल्याचं प्रसिद्धी पत्रकामध्ये आयसीसीनं म्हंटलं आहे. 


आयसीसीनं घातलेल्या या बंदीमुळे यासिर शहा सध्या सुरु असलेली पाकिस्तान सुपर लीग तसंच थोड्याच दिवसात होणारा एशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपला मुकणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीरिज इंग्लंड विरुद्ध जूनमध्ये होणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत यासिरला कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळता येणार नाही.