पुणे : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलेय. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत संपुष्टात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियच्या स्टीव्ह कीफेने तब्बल ६ विकेट घेत भारताच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले. सलामीवीर लोकेश राहुलच्या ६४ धावांव्यतिरिक्त भारताच्या एकाही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आली नाही. 


भारताचे ८ फलंदाज केवळ एकेरी तर काही शून्यावर बाद झाले. भारत पहिल्या डावात १५५ धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवशीही सामन्यावर गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.