मोहाली : भारत वि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 236 धावांत संपुष्टात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना इंग्लंडचा संपूर्ण डाव 236 धावांत गुंडाळला. आर. अश्विनने या डावात तीन तर जयवंत यादव, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.


तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात चार बाद 78 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी या धावसंख्येत केवळ 158 धावांची भर घालता आली. या सामन्यात विजयासाठी भारताला 103 धावांची गरज आहे. 


हा विजय मिळवल्यास पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 2-0 अशी आघाडी घेऊ शकतो.