भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर आटोपलाय.
पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर आटोपलाय.
पुण्याच्या मैदानावरील तिसरा दिवसही गोलंदाजांनीच गाजवला. भारताने केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर आटोपण्यात यश मिळाले.
या कसोटीत अद्यापही अडीच दिवस बाकी आहेत त्यामुळे भारताने संयमी फलंदाजी केल्यास पहिला सामना खिशात घालण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या एकूण सहा विकेट पडल्या. यात अश्विनने सर्वाधिक ४ तर रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने शतक झळकावले.