रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरी टेस्ट रंगतदार ठरत आहे. टीम इंडिया सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. भारत विजयापासून 6 विकेट दूर आहे. पांचव्या आणि शेवटच्या दिवशी लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावल्या असून 111 रन केले आहेत. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया अजूनही 41 रन मागे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्श 30 आणि हँड्कॉब 16 रनवर खेळत आहे. आज ईशांत शर्मा आणि जडेजाने एक-एक विकेट घेतल्या. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला दोन झटके दिले. सगळ्यात आधी ईशांत शर्माने रेनशॉला तर कर्णधार स्टीव स्मिथला जडेजाने आउट केलं.


याआधी टीम इंडियाला पहिली इनिंगमध्ये 152 रन्सची आघाडी मिळाली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दो विकेट गमवत 23 रन केले होते. पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 451 रन केले होते. भारतीय टीमकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 202 आणि रिद्धिमान साहाने 117 रन केले. त्याच्या जोरावर टीम इंडियाने 603 रन केले.