हैदराबाद : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात यजमान भारताला विजयासाठी ७ विकेट गरजेच्या आहेत. सामन्यातील आजचा अखेरचा दिवस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या दिवसात बांगलादेशला ३५६ धावांची गरज असून त्यांचे सात क्रिकेटपटू शिल्लक आहेत. पहिला डाव ६८७वर घोषित केल्यानंतर बांगलादेशला पहिल्या डावात केवळ १५९ धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ४ बाद १५९वर डाव घोषित केला. 


चौथ्या दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात ३ बाद १०३ धावा केल्या. अद्यापही त्यांना साडेतीनशेहून अधिक धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी ७ विकेट घेणे आवश्यक आहे.


सामन्याची वेळ : सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु