धर्मशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला आता फक्त ८७ रन्सची आवश्यकता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर १९/० एवढा झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव १३७ रन्सवर ऑलआऊट झाल्यामुळे भारताला विजयासाठी १०६ रन्सची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाला एवढ्या कमी धावसंख्येत रोखण्यात सगळेच भारतीय बॉलर्स यशस्वी ठरले. उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विननं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली.


तिसऱ्या दिवसाची सुरुवात २४८/६ अशी करणाऱ्या भारताला ३३२ रन्सपर्यंत मजल मारता आल्यामुळे ३२ रन्सचा लीड मिळाला. रवींद्र जडेजानं केलेल्या ६३ रन्समुळे भारताला ही महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.


चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये पुण्यातली पहिली टेस्ट कांगारूंनी जिंकल्यावर भारतानं बंगळुरूमध्ये कमबॅक केलं तर रांचीमधली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली. यामुळे ही मॅच जिंकत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा आपल्याकडे घेण्याची चांगली संधी आता भारतापुढे आहे.