सराव सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पोपट!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन दिवसांच्या सराव सामन्याला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरुवात झाली आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन दिवसांच्या सराव सामन्याला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 327 रनवर पाच विकेट गमावल्या आहेत. शॉन मार्श आणि स्टिव्ह स्मिथच्या सेंच्युरीमुळे या सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली.
ऑस्ट्रेलियासाठी हा सराव सामना असला तरी या मॅचमध्ये त्यांचा किती सराव झाला हा प्रश्न उपस्थित होत आहे. या मॅचसाठी ब्रेबॉर्न स्टेडियमवर हिरवी खेळपट्टी बनवण्यात आली होती. एवढच नाही तर भारतानं टीममध्ये शहबाज नदीम या एकमेव स्पिनरला संधी दिली होती.
23 तारखेपासून सुरु होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये एकाही मॅचमध्ये फास्ट बॉलरना मदत करणारी हिरवी खेळपट्टी मिळण्याची शक्यता नाही. या चारही मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला स्पिनर्सना अनुकूल खेळपट्ट्या मिळण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे सराव सामन्यामध्ये हिरवी खेळपट्टी आणि फक्त एकच स्पिनर घेऊन भारताच्या ए टीमनं ऑस्ट्रेलियाचा चांगलाच पोपट केल्याचं म्हणावं लागेल.