बंगळूरु : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळूरुमधील पराभवानंतर सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाला हा मोठा धक्का आहे. स्टार्कच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तो पुढील दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. 


यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्श दुखापतीमुळे स्वदेशी परतला होता. त्यातच आता पुन्हा स्टार्कही दुखापतीमुळे सामन्यात खेळू न शकणार असल्याने ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडलीये.


भारताविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यांत त्याने पाच विकेट घेतल्या. यातील विराट कोहलीची विकेट महत्त्वाची होती.