दुसऱ्या दिवसअखेर भारत 6 बाद 248
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर 6 बाद 248 इतक्या धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकले आणि भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशी गारद झाला.
धरमशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर 6 बाद 248 इतक्या धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकले आणि भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशी गारद झाला.
नॅथनने 4 बळी मिळवत भारताच्या डावाला सुरुंग लावला. सलामीवीर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी खेळी केली. लोकेशने 60 तर पुजाराने 57 धावा केल्या.
कर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक 4 धावांनी हुकले. आर. अश्विनला 30 धावा करता आल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वृद्धिमन साहा 10 आणि रविंद्र जडेजा 16 धावांवर खेळत होते. भारत अद्यापही पहिल्या डावात 52 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 4 गडी शिल्लक आहेत.