लखनऊ : युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अखेरचा सामना आज भारत वि बेल्जियम असा रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शूटआऊटपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 15 वर्षानंतर भारताला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. 2001मध्ये भारताच्या युवा संघाने जेतेपद मिळवले होते. हे जगज्जेतेपद मिळवण्याची आणखी एक संधी भारतीय संघाला आहे. 


क्वार्टरफायनलमध्ये स्पेन आणि सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. त्यासोबतच घरच्या मैदानावर सामना असल्याने चाहत्यांचा मोठा पाठिंबा भारतीय संघाला असेल. 


सामन्याची वेळ : संध्याकाळी 6 वाजल्यापासून