नागपूर : टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये भारतीय बॉलिंगच्यावेळी हे काही अनोखे रेकॉर्ड नोंदविण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत टी-२० क्रिकेटचे पाच सामने खेळले गेले असून, ते सर्व सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. 


२. वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच बॉलवर न्यूझीलंडच्या बॅटमन्स् मार्टिन गुप्टिलने सिक्स मारला.


३. अश्विनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या  बॅटमन्स्नी दोन सिक्स मारलेत. या दोन्ही सिक्सची रेकॉर्ड म्हणून नोंद झाली आहे. कारण टी-२० सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये याआधी दोन सिक्स मारले गेलेले नाहीत.


४. पहिल्या ५ ओव्हर म्हणजे पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंड केवळ ३३ रन्स करु शकली. टी-२० मध्ये २०१४नंतर १४ सामन्यात खेळलेला सर्वात कमी स्कोअर आहे.


५. गेल्या ९ टी-२० सामन्यात टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये दोन विकेट घेतल्या आहेत. आशीष नेहरा टीम इंडियात ८ सामन्यात ५ ओव्हरनंतर एक विकेट घेतलेली आहे.