भारत vs v न्यूझीलंड: वन डेमध्ये कोणाला संधी कोणाला डच्चू
न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सुरेश रैनाचं टीममध्ये कमबॅक झालंय. तर मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि आर.अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सुरेश रैनाचं टीममध्ये कमबॅक झालंय. तर मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि आर.अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.
मुंबईकर धवल कुलकर्णी आणि महाराष्ट्राच्या केदार जाधवला संधी देण्यात आली आहे. तर गौतम गंभीरचं वन-डेतही कमबॅक होईल अशी शक्यता होती. मात्र, तसं काही झालं नाही.
एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये सिलेक्शन कमिटीची बैठक झाली. 16 ऑक्टोबरपासून टीम इंडियाच्या मिशन वन-डेला सीरिज सुरुवात होणार आहे. पहिली वन-डे धर्मशालामध्ये रंगणार आहे.
भारतीय संघ पुढील प्रमाणे -
एम. एस. धोनी (कप्तान), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीप सिंह, केदार जाधव