आजपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडेचं युद्ध
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर आता भारतीय संघ वनडेसाठी सज्ज झालाय.
धरमशाला : न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर आता भारतीय संघ वनडेसाठी सज्ज झालाय.
वनडे मालिकेतील पहिला सामना आज होतोय. पाहुण्यांना कसोटीत धूळ चारल्यानंतर यजमान संघ वनडेतही चांगली कामगिरी करण्यास सज्ज झालाय. तसेच हा भारताचा 900वा वनडे सामना आहे.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. सुरेश रैनाला ताप आल्याने त्याला आजच्या सामन्यात खेळता येणार नाही. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
दोन्ही संघात आतापर्यंत 93 सामने खेळवण्यात आले यापैकी 46मध्ये भारताने विजय मिळवला तर न्यूझीलंडने 41 सामन्यांत विजय मिळवला.
सामन्याची वेळ - दुपारी 12.30 वाजता
संघ - एमएस धोनी (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मनीष पांडे, जयंत, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, केदार जाधव, मनदीप, अमित , धवल कुलकर्णी, उमेश आणि हार्दित पंड्या.