नवी दिल्ली : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी वनडे आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर रंगणार आहे. सिरीजमध्ये टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही आघाडी वाढवण्याच्या इराद्यानेच धोनी ब्रिगेड मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा बॅट्समन सुरेश रैना दुस-या वनडेतूनही आऊट झालाय..  रैना अजूनही आजारपणातून सावरलेला नाही. तो अजूनही मॅच फिट नसल्याचं टीम मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. 


त्यामुळे धरमशाला इथल्या पहिल्या वनडेत विजय मिळवणा-या भारतीय क्रिकेट संघात दुस-या वनडेसाठी कोणताही बदल होणार नसल्याचं समजतंय. तर तिकडे न्यूझीलंडपुढे सिरीजमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. 


सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वाजता