COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नवी दिल्ली : २०१५च्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये मौका-मौका या जाहिरातीने चांगलाच धुमाकूळ घातला होता. क्रिकेट चाहत्यांनीही या जाहिरातीला मोठी पसंती दर्शवली होती. 


भारतात सुरु असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये आता पुन्हा एकदा नव्याने मौका-मौकाची नवी जाहिरात आलीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ मार्च रोजी सामना रंगणार आहे. या सामन्याच्या धर्तीवर ही जाहीरात आहे. 


भारताविरुद्धच्या गेल्या चार सामन्यात पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे इमोशनल झालेला एक पाकिस्तानचा फॅन शाहीद आफ्रिदीला विनवणी करतोय की या मॅचमध्ये भारताला दाखवून द्या सिक्स काय असतो ते.