पुणे : पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात पाहुण्या श्रीलंका संघाने भारतीय संघाला चांगलीच धूळ चारली. भारताने विजयासाठी ठेवलेले १०२ धावांचे आव्हान लंकेने पाच गडी राखून पूर्ण केले. या सामन्यात भारतालाचा पराभवाचा धक्का बसला तरी अनेक रेकॉर्ड प्रस्थापित झाले. 
 
# टी- ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताचा संपूर्ण संघ अवघ्या १०१ धावांत आटोपला. टी-२० मधील भारताने तिसऱ्यांदा नीचांकी धावसंख्या उभारली. याआधी २००८मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात मेलबर्नमध्ये ७४ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला होता. त्यानंतर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत ९२ धावांवर ऑलआउट झाला होता. 
 
# या पहिल्या टी-२०मध्ये वेगवान गोलंदाजांनी आठ विकेट मिळवल्या. श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ही कामगिरी केली. याआधी श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी टी-२०मध्ये भारताविरुद्ध सात विकेट मिळवले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# टी-२० मध्ये पहिल्या १० षटकांत सहा विकेट गमावण्याची भारताची ही तिसरी वेळ. याआधी न्यूझीलंडविरुद्ध २००८-०९मध्ये भारताने १० षटकांत सहा विकेट गमावल्या होत्या. २०१०मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पहिल्या १० षटकांत सहा विकेट गमावल्या होत्या. 


# टी- 20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दोन फलंदाज एकाच षटकांत बाद झाले. 


# भारतविरुद्ध मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावणाऱ्या श्रीलंकन गोलंदाजा कासूनने पहिल्याच सामन्यात तीन विकेट मिळवण्याची किमया साधली. पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा चौथा गोलंदाज ठरलाय. 


# सुरेश रैना टी २०मध्ये ५०हून अधिक सामने खेळणारा दुसरा फलंदाज आहे. 


 


# आर. अश्विनने या सामन्यात नाबाद ३१ धावा करता टी-२० कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या केली. याआधी त्याने नाबाद १७ धावा केल्या होत्या. तसेच आठव्या अथव्या नवव्या स्थानावरील फलंदाजाने केलेली ही धावसंख्या दुसरी सर्वात मोठी ठरली. 


# आतापर्यंत टी-२० कारकिर्दीत अश्विन ३२ सामने खेळलाय. यात ८ वेळा त्याला फलंदाजीची संधी मिळाली. यात तो केवळ तीन वेळा बाद झालाय.