सबिना पार्क : वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी आजपासून सुरू होणारय. पहिल्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामनाही खिशात घालण्यासाठी सज्ज झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबिना पार्कवर हा दुसरी कसोटी होणार आहे. पहिल्या कसोटीतील पराभवाचं उट्ट काढण्यासाठी वेस्टइंडिज संघही तयारीने मैदानात उतरेल. नुकतीच प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतलेल्या अनिल कुंबळेने धडाक्यात सुरूवात केलीय.  


वेस्टइंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. तर आर. अश्विनने शतक ठोकतानाच सात बळी घेत 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब पटकावला होता.  


सामन्याची वेळ : साडेआठ वाजता.