हैदराबाद : बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवलाय. भारताने या कसोटीत बांगलादेशवर २०८ धावांनी विजय मिळवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयासोबतत कर्णधार विराट कोहलीने मालिका विजयाची परंपरा कायम राखलीये. विराटच्या नेतृत्वाखालील भारताचा सलग सहाव्या मालिकेतील विजय आहे. 


भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ६८७ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात बांगलादेशला केवळ ३८८ धावा केल्या. त्यानंतर भारताने दुसरा डाव ४ बाद १५९ धावांवर घोषित केला आणि बांगलादेशला फलंदाजी करण्याची संधी दिली. 


मात्र अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे त्यांना दुसऱ्या डावात केवळ २५० धावा करता आल्या. बांगलादेशचा संपूर्ण संघ २५० अवघ्या धावांत आटोपला. १९ कसोटी सामन्यात अपराजित राहण्याची किमया विराट कोहलीने साधलीये. याबाबतीत त्याने सुनील गावस्करलाही मागे टाकलेय.