विशाखापट्टणम: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा 9 विकेटनं दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं मालिकाही खिशात टाकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

83 रनचं माफक आव्हान पार करायला भारतीय संघाला 13.5 ओव्हर लागल्या. हे आव्हान पार करताना भारतानं रोहित शर्माच्या रुपात एक विकेट गमावली. तर शिखर धवननं नाबाद 46 आणि अजिंक्य रहाणेंनं नाबाद 22 रन केल्या.


टॉस जिंकून कॅप्टन धोनीनं पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला, धोनीचा हा निर्णय भारतीय बॉलरनी योग्य ठरवला. आर.अश्विननं पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीलंकेला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र श्रीलंकेचा डाव सावरला नाही. त्यांचा 18 ओव्हरमध्ये 82 रनवर ऑल आऊट झाला. 


भारताकडून अश्विननं सगळ्यात जास्त 4 विकेट घेतल्या, तर सुरेश रैनाला 2 आणि नेहरा, बुमरा, जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. आर.अश्विनला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.