मुंबई :  टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.



भारतावर 30 पैसे भाव लावण्यात आला. तर एशिया कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या हेवीवेट्स टीम्सचा धुव्वा उडवत फायनल गाठणा-या बांग्लादेशच्या टीमला विजयासाठी तिसरी पसंती देण्यात आली आहे. 



तर आणखी एक एशियन टीम पाकिस्तानचं मार्केट मात्र डाऊन आहे. बॅट्समनमध्ये सध्याचा इनफॉर्म बॅट्समन विराट कोहलीला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. 



त्याचप्रमाणे आर.अश्विनला बॉलर्समध्ये पसंती मिळाली आहे. त्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा नंबर लागतोय. 



तर सर्वाधिक भाव हा साहजिक मोस्ट अवेटेड अशा भारत आणि पाकिस्तान मॅचवर लागेल, अशी शक्यता आहे.