मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचला युद्धाचंच स्वरुप येतं. मात्र, टी-20 वर्ल्ड रपमध्ये एक टीम अशी आहे त्यांचं या दोन्ही टीमशी एक स्पेशल कनेक्ट आहे. पाहूयात कोणत्या टीमचं आहे इंडो-पाक कनेक्शन ते... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भारत आणि पाकिस्तान वंशाचे क्रिकेटर एकाच टीममध्ये हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटत असेल....मात्र, टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग राऊंडमध्ये ओमानच्या टीमध्ये पाच भारतीय आणि सहा पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटू खेळतायत... 
 
 एवढच नाहीतर या टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये भारत आणि लंकन क्रिकेटर्सचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ओमाननं क्वालिफाईंग राऊंडमध्ये आयर्लंडला पराभूत करण्याची किमया साधली... 
 
 ज्या आयर्लंड टीममुळे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि कॅरेबियन टीमला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. ओमान टीममध्ये भारताच्या मुनीश अंसारी, अजय लालचेता, जतिंदर सिंह, राजेश कुमार आणि वैभव वाटेगावकर या पाच क्रिकेटर्सनी आपली जागा निश्चित केली आहे.


 या टीमला स्पिन बॉलिंगचं मार्गदर्शन हे सुनील जोशी करतो. ज्यानं आपल्या स्पिन बॉलिंगची छाप भारताकडून सोडली होती. सुनील जोशी हा हैदराबाद आणि जम्मू-काश्मीर टीमचा कोचही होता. तर फिल्डिंग कोचची जबाबदारी विजय भारद्वाजकडे आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा सुल्तान अहमद या टीमचा कॅप्टन आहे. 
 
 खावर अली, जीशान सिद्दीक, बिलाला खान, अदनान इल्यास आणि आमीर अलीमुळे ओमानची टीम अधिक मजबूत झाली आहे. तर श्रीलंकेचा दुलीप मेंडिस ओमान टीमचा मुख्य कोच आहे. तर रमेश रतननायके बॉलिंग कोच आहे.... त्यामुळे या टीमला आता क्रिकेट जगतामध्ये टीम हो तो ऐसी म्हटलं जातंय...