पुणे : टीम इंडियाचा कॅप्टन असणं हॉट सीट आहे....या ठिकाणी प्रेम,  लक्ष, टीका सगळं काही एका वेळी होतं असतं... त्यामुळे कसोटी बरोबरच वन डे टीमचा कॅप्टन होण्याकडे मी एक संधी म्हणून पाहतो, मात्र त्या सोबत ही एक मोठी जबाबदारी देखील आहे,  असे भारताच्या क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार विराट कोहली यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील एका मॉलच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या... मंदिरा बेदी हिने विराट कोहली याची मुलाखत घेतली.


मला कॅप्टन्सीचा ताण नाही, मात्र मला स्वतःच्या मर्यादा पडताळून पहायला आवडतं कारण त्यामुळे आपल्याला आपली क्षमता कळते,
आपल्या बरोबर खेळणा-यांच्या चांगल्या गोष्टी जाणून तसेच त्यांच्या कमतरता समजून घेणं आणि संघाला निराशेपासून दूर ठेवण हे कॅप्टनचं काम आहे, असेही विराटने मुलाखतीत सांगितले. 
 
हा दिवस माझ्या आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं, मी आणि इशांत शर्मा आम्ही चेंजिंग रुम मधले जोकर आहोत, सिनिअर प्लेअर असलेल्या टीमचा कॅप्टन असणं अवघड नाही, असेही मत त्याने व्यक्त केले. 


2011 मधील वर्ल्ड कप,  मुंबई येथे केलेली डबल सेंचुरी, हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात ह्रद्यस्पर्शी क्षण आहेत, असेही त्याने नमूद केले.