भारताने बांग्लादेशविरोधात या ५ कारणांमुळे सांभाळून खेळावं
आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.
मुंबई : आशिया कप टी-२० मध्ये भारत आणि बांग्लादेश हे फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अनेक भारतीय समर्थकांना वाटत असेल की बांग्लादेश आहे तर मग फायनल आशिया कप भारतच जिंकणार. पण असा विचार करणे चुकीचं आहे.
बांग्लादेश एक चांगली टीम म्हणून समोर आली आहे. भारत विरूद्ध एक मॅचमध्ये पराभव वगळता त्यांनी सगळ्या मॅच जिंकल्या. त्यामुळे संघात फायनलमध्ये मोठे उलटफेर करण्याची ताकद आहे.
भारताने या ५ कारणांमुळे बांग्लादेशविरोधात सांभाळून खेळावं :
१. बांग्लादेश त्यांच्या होम ग्राउंडवर फायनल खेळणार आहे. त्यामुळे फॅन देखील मोठ्या प्रमाणात सपोर्ट करण्यासाठी मैदानावर उपस्थित असतील. त्यामुळे बांग्लादेशचे खेळाडू मैदानावर आणखी आक्रमक दिसतील.
२.पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणारी बांग्लादेश शेवटपर्यंत पराभव स्विकारत नाही. शेवटपर्यंत ते मॅचमध्ये झुंज देत असतात. त्यामुळे जो चांगला खेळ दाखवेल ती टीम ही मॅच जिंकेल.
३. बांग्लादेशचा कॅप्टन मुर्तजा हा देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऑलराऊंडर म्हणून तो खूपच चांगला आहे. त्याची फिल्डींग तोडणं हे देखील भारतीय संघासमोर मोठं आव्हान राहणार आहे.
४. बांग्लादेशकडे खूप चांगले फास्ट बॉलर आहेत. त्यांची धारदार बॉलिंग भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे. त्यांचे सगळेच बॉलर चांगल्या फास्ट धारदार बॉलिंगसाठी यशस्वी ठरले आहेत.
५. बॉलिंग प्रमाणे बांग्लादेशकडे चांगली बँटींग ऑडर आहे. बांग्लादेशचे खेळाडू ८ व्या क्रमांकापर्यंत चांगली बँटीगचं प्रदर्शन करु शकतात. तमीम इक्बाल हा सध्या चांगला खेळत नसला तरी त्याची बँटींग चालणं हे भारतासाठी आव्हान असू शकतं.