`भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल`
भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल असा विश्वास भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलाय. भारतीय संघ टॉप चारमध्ये निश्चित असेल मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये ज्यांचा खेळ चांगला राहील तेच जिंकतील असे द्रविड म्हणाला.
नवी दिल्ली : भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत नक्की पोहोचेल असा विश्वास भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलाय. भारतीय संघ टॉप चारमध्ये निश्चित असेल मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये ज्यांचा खेळ चांगला राहील तेच जिंकतील असे द्रविड म्हणाला.
भारतीय संघ समतोल आहे. या संघात अनेक गुणवान क्रिकेटपटू आहे. हार्दिक पंड्या, पवन नेगी आठव्या, नवव्या नंबरवर येऊन धावा करु शकतात. या परिस्थितीत भारतीय संघाला हरवणे मुश्किल असेल, असेही पुढे द्रविडने सांगितले.
तसेच भारतीय संघाकडे आता गोलंदाजीसाठीही चांगले ऑप्शन आहेत. संघात आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतायत, असे द्रविडने म्हटले.