श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय
काही दिवसांपूर्वी झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत धोनी ब्रिगेडने २-० ने धूळ चारली होती. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत कमाल केलीये. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत महिला संघाने २-० ने विजयी आघाडी घेतलीये. सलग तिसरा सामना जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी महिला संघाकडे आहे.
रांची : काही दिवसांपूर्वी झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत धोनी ब्रिगेडने २-० ने धूळ चारली होती. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत कमाल केलीये. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत महिला संघाने २-० ने विजयी आघाडी घेतलीये. सलग तिसरा सामना जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी महिला संघाकडे आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेला तब्बल १०७ धावांनी हरवले. त्यानंतर रांचीत झालेल्या दुसऱ्या वनडेत ६ विकेट राखून पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या. भारताने हे आव्हान ४१ चेंडू आणि सहा विकेट राखून सहज पूर्ण केले आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली.
मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १९ फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर तिसरा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न यजमान श्रीलंका करेल.