कोलकाता: भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची टीमही सहभागी झाली आहे. या टीमचा बॅटिंग कोच आहे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हक तर बॉलिंग कोच आहे भारताचा माजी फास्ट बॉलर मनोज प्रभाकर. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध कोलकत्याच्या इडन गार्डनमधल्या मॅचवेळी हे दोघं बाजूला बसलेले पाहायला मिळाले. 


क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत-पाकिस्तानमधला संघर्ष आपण नेहमीच पाहतो. पण  भारत पाकिस्तानमधली ही आगळी वेगळी युती बहुतेक पहिल्यांदाच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहे.